Sunday 18 February 2018

सनी व बबन्याच्या टेक्निकल गप्पा

सनी व बबन लंगोटिया यार. म्हणजे शाळेतले विटिदांडू व क्रिकेट चे गल्ली क्रिकेट तिथपासून कॉलेज मधले वर्गांऐवजी मैदानावर क्रिकेटियर होण्याची स्वप्ने पाहत घालवलेले तासन्तास, त्यासाठी झालेला कटिंग चहा वरचा खर्च या सर्वातच ते भागीदार होते. तशी त्यांची पाळण्यातली किंवा आधारकार्डावरची नावे साईनाथ उर्फ सनी आणि हर्षवर्धन उर्फ बबन. त्यांची ही नावे कशी पडली ते नंतर कधीतरी बोलु.

तर या दोघांमध्ये काही साम्यस्थळे व काही जमीनआस्मानाचे फरक. पण काही झाले तरी दोघांचा चर्चेवर फार भर, मग ती चर्चा कधीही, कुठेही होवो, मग त्यासाठी पाय दुखेपर्यंत सायकलीच्या सिटावर टेकवून तासन्तास रंगलेल्या गप्पा असोत, मारुतीच्या मंदिराबाहेर शनिवारी मध्यरात्रीपर्यंत चर्चा रंगल्यावर पोलिसांनी हटकलेलं असो किंवा चुकलेल्या अनेक बस व लोकल ट्रेन्स असोत. दोघांच्या जिव्हाळ्याचा नाही असा जगात विषय नाही. पण आपण इथे मुख्यत: त्यांच्यात रंगलेल्या एजुकेशनल गप्पाच पाहणार आहोत..कारण त्यांची मजाच न्यारी..कटिंगचा चहा पिल्यावर आजुन प्यावा असा चटका लावून जाणारी..पुन्हा पुन्हा चहाच्या टपरीकडे पावलं वळवणारी..


या गप्पांमधून नवीन टेक्नॉलॉजी किती माहिती पडतील हा प्रश्नच आहे. कारण जुन्या टेक्नॉलॉजी, किंवा ज्याना आपण जुन्या म्हणतो अशा टेक्नॉलॉजीच्या सर्व गोष्टी तरी आपल्याला कुठं माहिती असतात..

बऱ्याच वेळा कणेकर म्हणतात तसं “आपल्याला माहित नाही हेच आपल्याला माहित नसतं”..असो..तर वळूया या दोघांच्या टॉपिक कडे..


No comments:

Post a Comment